रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील लोटे या ठिकाणी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थेच्या गोशाळेमध्ये असणाऱ्या 12200 गायींच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या सहा दिवसांपासून या गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे महाराज हे गोशाळेत उपोषणाला बसले आहेत आज त्यांचे आंदोलन चिघळले असून ते गोशाळेतील हजारो गाईंना घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयासमोर घेऊन जाणार आहेत हजारोंच्या संख्येत असणाऱ्या गाई मुंबई गोवा महामार्गावरून गेल्या तर वाहतुकीचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे त्यांच्या विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत ते आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान त्यांच्या या गाई वासरांना घेऊन काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी