Gadchiroli Rain : गडचिरोलीतील पर्लकोटा नदीला पूर, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला | Marathi Newsब्रेकिंग न्यूज पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा परत एकदा संपर्क तुटला आहे.. गडचिरोली जिल्हा सह लगतच्या छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून काल सकाळी ओसरलेला पर्लकोटा नदीचा पूर पुन्हा आला असून मोठा पूल पाण्याखाली गेल्याने संपूर्ण भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.. भामरागड तालुक्यातील शंभर गावे पुन्हा संपर्कहीन झाली आहेत..