काहीतरी वेगळा खाद्यपदार्थ मिळत असेल तर कोल्हापूरकर त्या ठिकाणी नेहमीच गर्दी करत असतात. अशाच प्रकारे कोल्हापुरात एके ठिकाणी बॉम्बे वडा हा वेगवेगळ्या प्रकारे मिळतो. बॉम्बे वड्याची तीच चव वेगवेगळ्या प्रकारे खवय्यांना चाखता येते. बीबीक्यू बॉम्बे वडा, तंदूर बॉम्बे वडा या अनोख्या प्रकारांसोबतच या वडा सेंटरवर सध्या जैन लोकांसाठी खास जैन बॉम्बे वडा देखील सुरू करण्यात आला आहे.