वर्धा जिल्ह्यातील वर्धा -आर्वी मार्गावर असलेल्या सेवा येथील महारुद्र हनुमान देवस्थानाची ख्याती सर्व दूर पसरलेली दिसून येते. सेवा येथील मारुती मंदिराला अंदाजे 70 ते 75 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. या देवस्थानाची विशेषतः म्हणजे मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही दिवसेंदिवस वाढत असून मूर्तीवर नैसर्गिक रित्या काही बाण दिसून येतात आणि या बाणांची वाढ होत असल्याचं सांगितलं जातं. मंदिरात नतमस्तक होऊन हनुमान चरणी प्रार्थना केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात,अशी भाविकांची श्रद्धा आहे.