उन्हाळा सुरू झाला की थंड पेयांच्या स्टॉलवर गर्दी वाढू लागते. सरबत, कोकम आणि लस्सीसारखी पारंपरिक थंड पेये लोक आवडीने पितात. महाराष्ट्रात आजही दुधापासून बनवली जाणारी लस्सी लोकप्रियता टिकवून आहे. लस्सी बारमाही प्यायली जात असल्याने लस्सी व्यवसायाकडेही अनेकांचा कल असतो. मोठ्या ब्रँडच्या लस्सींसोबतच काही स्थानिक विक्रेत्यांची लस्सीही एक ब्रँड बनते. असंच काहीसं उदाहरण साताऱ्यातील काका लस्सीबाबत आहे.