गरिबीमुळं दुसऱ्याचं ओझं ओढून पोटाची खळगी भरणारे अनेक हमाल आपण पाहिले असतील. हातगाडीवर ओझं ओढताना त्यांचे होणारे हाल बघवत नाहीत. मात्र, जगण्यासाठी त्यांना हे काम करावंच लागतं. अशा मजुरांचा भार काहीसा हलका करण्याचं मोठं काम छत्रपती संभाजीनगरमधील एका इंजिनिअर तरुणानं केलंय. हमाल काम करणाऱ्यांसाठी सुयोग चांडक यांनी खास इलेक्ट्रिक हातगाडी तयार केलीय. विशेष म्हणजे यासाठी त्यांना पेटंट देखील मिळालंय.