वडापाव म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही कारण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वडापावची मोठी क्रेझ पाहायला मिळते. जसा गाव तसा वडापाव आपल्याला वेगवेगळ्या चवीनुसार, वेगवेगळ्या किमतीनुसार खायला मिळतो. अश्याप्रकारेच साताऱ्यातील पवई नाका परिसरात मिलिंद धुमाळ हे वडापावचा व्यवसाय करत आहेत. त्यांची वडापाव विक्रीची सुरुवात 75 पैशापासून झाली होती. काही काळ दीड, दोन रुपयाला वडापाव विकणारे मिलिंद धुमाळ सद्यस्थितीत 15 ला 2 वडापाव विकत आहेत. त्यांच्या वडापाव स्टॉलवर खवय्यांची मोठी गर्दी असते.