निसर्गातील विविध भाव भावनांचा अंतर्भाव असलेला सृजनशील अविष्कार म्हणजे कला होय. या भावना व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे कला आणि असा अविष्कार निर्माण करतो तो कलाकार होय. सध्याच्या काळात कलाकारांना बऱ्याचदा विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. पण परिस्थितीशी झगडतही काहीजण आपली कला जिवंत ठेवत असतात. असाच एक कलाकार पुण्यात आहे. सुरक्षा रक्षकाची नोकरी करत दत्ता लांडे यांनी पेन्सिल चित्र रेखाटण्याची कला जोपासलीय.