राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झालं आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 11पर्यंत 18.14 टक्के मतदान झालं आहे. अनेक मतदान केंद्रात तर सकाळपासूनच रांगाच रांगा लागल्या आहेत. मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर, आज संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या 23 तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.