Demolition of the unauthorized part of Subhania Masjid in Dharavi has started. The construction is being done by the trustees of the mosque themselves. The trustees had given an assurance to the municipality that we will remove this unauthorized construction on our own. Accordingly, this construction is being done. A few days ago, there was tension in the area over the issue of demolition of the unauthorized construction of this mosque. After that, it was settled amicably. The tension subsided after the trustees gave an assurance that they would demolish the structure themselves.धारावीतील सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग तोडायला सुरूवात झाली आहे. मशिदीच्या ट्रस्टींकडूनच स्वतःहूनच हे बांधकाम काढलं जातंय. हे अनधिकृत बांधकाम आम्ही स्वतःहूनच काढू अशी हमी ट्रस्टींनी पालिकेला दिली होती. त्यानुसार हे बांधकाम काढलं जातंय. या मशिदीच्या अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मग सामंजस्यानं यावर तोडगा काढण्यात आला. ट्रस्टींनी आपण स्वतःच हे बांधकाम पाडण्याची हमी दिल्यानंतर हा तणाव निवळला.