Delhi Heavy Rain : राजधानी दिल्लीला पावसाने झोडपलं! सखल भागात साचलं पाणी... | Marathi Newsराजधानी दिल्लीला पावसाने झोडपलं...मुसळधार पावसामुळे इंडिया गेट , कॅनॉट प्लेस, गुडगाव आणि नोएडासह दिल्ली एनसीआर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय..रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं असून वाहतुकीलाही फटका बसला... दरम्यान हवामान विभागाकडून दिल्लीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला असून गरजेशिवाय प्रवास करू नका असं आवाहनही करण्यात आलंय..दरम्यान राजेंद्र नगर इथं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आणि काल पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालंय.