Dapoli Heavy Rain : रत्नागिरीला पावसाचा फटका, दापोली तालुका पाच दिवस अंधारात | Marathi Newsकोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे गेले पाच दिवस तालुक्यातील वीज नसल्यानं व्यापारी उद्योजक नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईट नसल्यानं दापोलीतील जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.