शेतीपूरक व्यवसायांमधून अनेक शेतकरी बांधव चांगलं उत्पन्न मिळवतात. गायीच्या दुधापासून तर उत्तम कमाई होते. पण तुम्ही कधी फक्त आवड म्हणून गाय पाळल्याचं कोणाला पाहिलंय का, तेही शहरी भागात. अनेक घरांमध्ये कुत्र असतं, मांजर असते. त्या घरातली माणसं आपल्या प्राण्यांची अगदी कुटुंबातील एक सदस्य म्हणून काळजी घेतात. परंतु पुण्यातील एका घरातल्या तरुण मुलाने चक्क गाय पाळलीये. ही पुंगनूर जातीची देशी गाय आहे, जीची उंची असते साधारण अडीच फुटांपर्यंत. महत्त्वाचं म्हणजे हा तरुण पेशाने वकील आहे.