पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. वेगवेगळ्या भागात मक्याला वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. पावसात अगदी कानाकोपऱ्यात मक्याचे स्टॉल दिसतात, तसंच खाणाऱ्यांची गर्दीही मोठी असते. रिमझिम पावसात, मसालेदार, गरमागरम, चटपटीत स्वीट कॉर्नचा सुगंध घेत लोक आस्वाद घेतात. पण भुट्टा चवीसोबतच आरोग्यासाठीही किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊया आहारतज्ज्ञ प्रणाली बोबडे यांच्याकडून.