सेद्रिंय शेतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘गांडूळ खत’. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी गांडूळ खत महत्त्वाचं असतं. हीच बाब लक्षात घेऊन पुणे महापालिकेकडून एक अत्यंत जबरदस्त असा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाअंतर्गत पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये गांडूळखत निर्मिती प्रकल्प पार पडतो. याबाबत मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणदेखील दिलं जातं. हा उपक्रम दीड हजारांहून अधिक सोसायट्यांमध्ये सुरू आहे. यात नेमकं होतं काय, जाणून घेऊया.