Collage Dress Code : कॉलेजमध्ये जीन्स, टी शर्टवर बंदी, आचार्य आणि मराठे महाविद्यालयाचा फतवाजर जीन्स आणि टी शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा कडक इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलाय. चेंबुरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना जीन्स आणि टीशर्ट घालण्यास मनाई करणारे परिपत्रक काढलं. यावर प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी केलीय. महाविद्यालयाने जो तालिबानी फतवा काढला तो मागे घ्यावा, असं निवेदन प्रताप सरनाईक यांनी विधान सभेत दिलंय. अनेक पालकांनीही आणि विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या भूमिकेला याला विरोध केलाय. दरम्यान याच कॉलेजनं हिजाब आणि बुरख्याविरोधातही फतवा काढला होता.