आपल्याकडे सणवाराला पुरणपोळीसोबत चिंचेचे पन्हे घेण्याची जुनी पध्दत आहे. लहान मुलं व स्त्रियांमध्ये खास लोकप्रिय असलेली चिंच जिभेवर ठेवताच एक वेगळाच फिल येतो. तोंडाला पाणी सुटण्यासह रुचिप्रदान करणे ही आंबट चिंचेची खासियत आहे. चिंच खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पाणीपुरी, इमली चटणी, चाट या प्रकारात चवीच्या दृष्टीने चिंच वापरली जाते. उन्हाळ्यात अनेकांना कोल्ड्रिंक आवडत नाहीत. तेव्हा 5 मिनिटांत तयार होणारे पारंपरिक चिंचेचे पन्हे ट्राय करता येतात. मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी चिंच पन्ह्यांची रेसिपी सांगितली आहे.