चंद्रपूर शहराच्या रय्यतवारी कॉलरी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सभोवताल कोळसा खाणी असलेल्या या भागातील शिवणकर यांच्या घरी वीस फूट खोल खड्डा पडलाय. घरातील मंडळी बाहेर गावाहून दोन दिवसानंतर घरी आल्यावर दरवाजा उघडताच घरातील महिला थेट 20 फूट खड्ड्यातच पडली. अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिकांच्या मदतीने शिडीचा वापर करून या महिलेला कसेबसे बाहेर काढले गेले. गेले दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भुभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस व वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.