Central Railway : माटूंगा स्थानकादरम्यान बांधकामाचं साहित्य पडल्याने गोंधळ,दुरुस्ती करून वाहतूक सुरुभर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा खोळंबलीय. त्यामुळे सकाळी घरातून निघालेल्या मुंबईकरांना ऑफिस गाठण्यासाठी उशीर होतोय. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळले होते. मात्र सुदैवानं मोटरमननं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. असं असलं तरी ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानं मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अखेर हे बांबू हटवण्यात आले असून सीएसएमटीकडे जाणार जलद मार्ग पुन्हा सुरू झालाय.