इंग्रजी नववर्ष जसं 1 जानेवारीला धुमधडाक्यात सुरू होतं. तसंच गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या सोनं खरेदीमुळे आपली भरभराट होते अशी मान्यता आहे. परंतु ही भरभराट तेव्हाच होते जेव्हा आपण सोनं योग्य मुहूर्तावर खरेदी करतो. 9 एप्रिलला सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा होईल. तुम्ही जर या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल, तर आधी शुभ मुहूर्त जाणून घ्या. गुरूजी उमेश कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे.