ओढ्याला अचानक निळं पाणी आल्याचा व्हिडिओ राज्यात प्रचंड व्हायरल झाला. वीज पडल्यानं निळं पाणी वाहत असल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला. मात्र आता याबाबत सत्य समोर आलं असून वीज पडल्याची अफवाच असल्याचं स्पष्ट झालंय. धाराशिव जिल्ह्यातील मसला खुर्द येथील हा प्रकार असून याबाबत भूवैज्ञानिक आणि गावातील सरपंचांनी माहिती दिली आहे.