अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य करायचं असेल तर त्या ठिकाणी ग्रीन कार्ड गरजेचं असतं. ग्रीन कार्ड असेल तर तुम्हाला अमेरिकेचा कायमस्वरूपी निवासासाठी परवाना मिळतो. अशीच काहीशी संकल्पना छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात सुरु केली आहे. शासकीय रक्तपेढीत किमान पाच पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला ग्रीन कार्ड देण्यात येणार आहे. हे ग्रीन कार्ड ज्या व्यक्तीकडे असेल त्याला घाटी रुग्णालयामध्ये अनेक सुविधा भेटणार आहेत.