BJP Vidhansabha Candidate : 35 वर्षात नालासोपाऱ्याचा विकास नाही , विकास काय असतो ते दाखवून देऊ- Naikभारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाकडून पालघर मधील नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. नालासोपारा विधानसभा मतदार संघात सध्या बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर हे आमदार आहेत. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपचे नालासोपारा 132 मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी shbh