अभिनेता रितेश देशमुख बिगबॉस च्या रूपाने प्रेक्षकांसमोर येतोय. 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वा प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेबद्दल रितेश प्रचंड उत्साही आहे. मुळातच त्याला स्वत:ला बीगबॉस हा कार्यक्रम आवडत होता, त्यामुळे बीगबॉस बनण्याची ऑफर आली तेव्हा त्याने निर्मात्यांना लगेच होकार दिल्याचं त्याने सांगितलं. आत्तापर्यंतच्या झालेल्या सीझनपेक्षा बीगबॉसचा नवा सीझन सर्वार्थाने वेगळा असणार असल्याचं रितेशने सांगितलंय. यासोबत आत्ताच्या कुटुंबव्यवस्थेवर भाष्य करताना रितेशने सुखी संसारचं रहस्यही न्यूज18लोकतला दिलेल्या एक्सक्लुझीव मुलाखतीत केलंय. रितेश देशमुख याच्याशी संवाद साधलाय आमचे न्यूज को-ऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी.