आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य करायचं म्हटलं की सर्वात पहिल्यांचा शुभ मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्त याचा अर्थ शुभवेळ किंवा चांगली वेळ असा असतो. कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ चांगल्या मुहूर्तावर केला तर त्याची फळे भविष्यात चांगली मिळतात, असा लोकमानस असतो. त्यामुळेच मुहूर्त शास्त्राला महत्त्व आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा मुहूर्त शास्त्राशी कधी ना कधी संबंध येतोच. लग्न, मुंज, नामकरण, गृहप्रवेश आदी सोहळ्यांसाठी मुहूर्त पाहूनच वेळ ठरवली जाते. हा शुभ मुहूर्त कसा काढला जातो? आणि त्याचे महत्त्व काय आहे? हे पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.