प्राणी आणि माणसातलं प्रेम काही नवं नाही. अगदी 24 तास जरी एखादा प्राणी आपल्यासोबत राहिला तरी आपल्याला त्याचा लळा लागतो. अशात जर अनेक दिवस एखादा प्राणी सोबत असेल तर तो अगदी आपल्या कुटुंबातला एक सदस्य होऊन जातो. मग अनेकजण आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतात. आता तर पाळीव मांजरीचं, गायीचं डोहाळे जेवणदेखील दणक्यात साजरं केलं जातं. शिवाय आपल्या प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कारही विधीवत पार पाडले जातात.