मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये वेळा अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. आज 11 जानेवारी रोजी वेळ अमावस्या असल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. लातूर जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्येच्या दिवशी शासकीय सुट्टी असते. तसेच एकही व्यक्ती गावात दिसत नाही. ग्रामीण भाषेत या सणाला यळवस असही म्हणतात. शेतात सहकुटुंब जाऊन घरून बनवून आणलेल्या पदार्थांचा नैवेद्य देवी देवतांना दाखवला जातो. तसेच, पूजा करून निसर्गाच्या सानिध्यात सह कुटुंब भोजनाचा आस्वाद घेतला जातो. याबाबतच स्थानिकांकडून माहिती घेऊयात.