शेती अभ्यासपूर्ण करा, असा सल्ला कृषीतज्ज्ञ वर्षानुवर्षे देताहेत. त्याचाच परिणाम गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळतोय, कृषी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. हे विद्यार्थी भविष्यात एक यशस्वी शेतकरी, कृषी व्यवसायिक किंवा कृषीतज्ज्ञ व्हावे यासाठी या महाविद्यालयांकडूनही विशेष उपक्रम राबवले जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयाबाहेर तर एक रसवंतीगृह आहे जे चक्क विद्यार्थी चालवतात. महत्त्वाचं म्हणजे हे साधंसुधं नाही, तर आधुनिक पद्धतीचं रसवंतीगृह आहे.