आज अक्षय तृतीयेचा सण आहे. हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या शुभ दिनी पुण्याचे आराध्य दैवत असणाऱ्या दगडूशेठ गणपतीला आज 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे.मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट, अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.