Ajit Pawar NCP | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा श्रीगणेशा केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय. यावेळी तटकरे आणि अजित पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावेत असं साकडं बाप्पाकडे घातल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.