Ahmednagar Protest : अहमदनगरमध्ये दूध दरासाठी आंदोलन, १० गावांमध्ये कडकडीत बंद | Marathi Newsअहमदनगर जिल्ह्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी दुधदरासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत असल्याचं दिसतंय.. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अकोले तालुक्यातील दहा गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय.. दुधाला चाळीस रूपये दर द्यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव, विरगाव, पिंपळगाव, समशेरपूर, देवठाण, वडगाव लांडगा, कळस, गुंजाळवाडी, सावरगाव पाट या दहा गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय... सरकार या आंदोलनाची दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...