महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील याच ठिकाणी ओळख स्ट्रॉबेरी शेतीसाठीही आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. मात्र, येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटांचा सामना करावा लागतोय. स्ट्रॉबेरी पिकावर करपा सारखे रोग, खराब हवामान यासारख्या नैसर्गिक संकटांनी शेतकरी अडचणीत येतायेत. तर जंगलातील गव्यांच्या वावरामुळे स्ट्रॉबेरीचे लाखोंचे नुकसान होत आहे.