ज्वारी हे मराठवाड्यातलं रब्बी हंगामातलं प्रमुख पीक. कधीकाळी गरिबांची भाकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीला मध्यंतरी सुगीचे दिवस आले होते. भाव पार 6 हजार रुपयांवर गेले होते. परंतु अवकाळी पावसाचा फटका ज्वारीच्या पिकाला बसला आणि आवक वाढल्यानंही भाव घसरले. ज्वारीच्या भावात क्विंटलमागे 2 ते अडीच हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापारी वर्गात सध्या चिंतेचं वातावरण आहे.