महाराष्ट्रातील काही शेतकरी आधुनिक शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेत आहेत. पुण्यातील हिंजवडी मान परिसरात राहणारे ज्ञानेश्वर बोडके यांनी अभिनव फार्मर्स क्लब या नावाने शेतकरी ग्रुप सुरू केला. 25 वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून ते काम करत आहेत. या क्लबच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील दीड लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून थेट ग्राहकांना भाजीपाल्यासह धान्य, फळे आणि दूधही विक्री केली जाते. सेंद्रिय शेतीतून लाखोंचा नफा क्लबमधील शेतकऱ्यांना मिळत आहे.