तराळाबाबत मानवाला नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. त्यामुळेच वेगवेगळे शोध लावण्यासाठी मानवाने विविध अंतराळ मोहिमा राबवल्या. आजही खगोलशास्त्रामध्ये प्रचंड संधी असून मानव जात वेगवेगळे नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करते. खगोलशास्त्रीय अनेक घटनांबाबत सामान्य माणूस हा अनभिन्न असतो. मात्र, खगोल शास्त्रातील तज्ज्ञ व्यक्ती या घटनांचा अर्थ चांगल्या प्रकारे लावू शकतो तसेच समजावून देखील सांगू शकतो. अशीच महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना 20 मार्च रोजी घडत असते. या दिवशी बरोबर 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. वर्षांतून केवळ 2 वेळा असा योग येतो. हे सगळं कसं घडतं? आपलं ऋतुचक्र का निर्माण झालं? याबद्दलच भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सुरेश केसापूरकर यांनी माहिती दिलीय.