आपलं स्वतःच सुंदर घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान निश्चित केले जाते. असे मानले जाते की, जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात. सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेकजण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात. वेगळी रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही. तर, काहीजण हॉल, किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात. देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते. त्यांची रोज पूजा केली जाते. किचनमध्ये देवघर असावं का? आणि ते कशापद्धतीच असावं याबाबतच पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी माहिती दिलीय.