उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात चारधाम महामार्गाचं काम सुरु असताना एका बोगद्यामध्ये दहा दिवसांपूर्वी मोठा अपघात घडला. त्यामुळे 41 कामगार त्या बोगद्यात अडकून पडले. या अडकलेल्या कामगारांशी आज प्रत्यक्ष संपर्क शक्य झाला. त्याचबरोबर त्यांना रेस्क्यू करण्याचं कामही युद्धपातळीवर सुरु आहे.