Toll free movement ended...Government court meetings were held...Cameras were installed at toll plazas....Yellow lines were drawn to regulate the vehicles, but as the 'toll' jam at the entrance of Mumbai is still not resolved, the vehicles traveling from Thane to Mumbai for a distance of just five minutes in the morning are charged as much as one quarter to one. Having to get stuck in a dilemma for hours.टोलमुक्तीचे आंदोलन संपले...सरकारदरबारी बैठका झाल्या...टोलनाक्यावर कॅमेरे लागले....वाहनांच्या नियमनासाठी पिवळी रेष आखण्यात आली, मात्र अद्याप मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 'टोल'कोंडी फुटतच नसल्याने अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी सकाळी ठाण्याहून मुंबईकडे कूच करणाऱ्या वाहनांना तब्बल पाऊण ते एक तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड टोलनाक्यावर पिवळ्या रेषेपलीकडे गाड्या गेल्यास टोल न घेण्याचा नियम दोन दिवसांपूर्वी याठिकाणी बजावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी देऊनही येथे कोंडीतही टोल वसुली जोरात सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री बसत असून त्यांच्या वाहनांमधील इंधन खर्ची पडत असल्याने टोल प्रशासनाच्या नावाने रोष व्यक्त केला जात आहे.