आपण सर्वजण रोजच चहा पितो चहा पिऊन झाल्यानंतर त्याची चहापूड कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. मात्र या चहापुडीचा देखील पुनर्वापर करता येतो आणि त्यापासून झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असे घटक बनवता येतात, असा विचार कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील संशोधकांच्या डोक्यात आला. त्यातूनच सुरू केलेल्या संशोधनाला आता यश आले आहे. टाकाऊ चहापूडपासून कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल या संशोधकांनी तयार केले आहे. नुकतेच त्याचे पेटंटही त्यांना मिळालंय. या संशोधनाचा उपयोग शेतातील उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे.