वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून फायनल सामन्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या सामन्यासाठी क्रिकेट रसिकांमध्ये मोठा उत्साह आहे.