स्ट्रीट फूड हे तसं सर्वांच्या आवडीचं असतं. आपण दाबेली, पाणीपुरी असे स्ट्रीट फूडचे अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण छोले कुलचे कधी खाल्लेत का ? छोले कुलचे हे दिल्लीतील फेमस स्ट्रीट फूड आहे. आता हे दिल्ली स्टाईलने बनवलेले छोले कुलचे पुण्यात खायला मिळतायेत. पुण्यातील झेड ब्रिज जवळ असलेल्या खाऊ गल्ली येथे हे दिल्लीचे फेमस बटर छोले कुलचे मिळतात. तसंच चिज बटर कुलचे, पनीर छोले कुलचे देखील मिळतात. परंतु हे छोले कुलचे नेमके कसे बनवले जातात या विषयी जाणून घेऊयात.