सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाला चक्क नोटांच्या मखरामध्ये बसवलं आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका गणपती मंदिराला तब्बल 2 कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आलं. बंगळुरुच्या पुत्तेनहल्ली परिसरातील श्री सत्य गणपती मंदिरात ही सजावट करण्यात आली. 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नाण्यांचा वापर करण्यात आला.यामध्ये 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या.पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय 22 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही 24 तास भाविकांवर राहणार आहे