सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. तसेच आपल्याकडे सापाची देवता म्हणूप पूजाही होते. याच सापांचे रक्षण करण्याचं काम सर्पमित्र करत असतात. पुण्यातील सर्पमित्र राजू कदम यांनी असंच सापाला जीवदान देताना त्याच्या अंड्यांनाही वाचवलं. विशेष म्हणजे दुर्मिळ बिनविषारी असणाऱ्या तस्कर सापाची अंडीही कदम यांनी वाचवली. विशेष म्हणजे याच अंड्यातून सापाशिवाय कृतिम पद्धतीनं त्यांनी 6 पिलांचा जन्म घडवून आणलाय. ही किमया कशी केली याबाबत कदम यांनीच माहिती दिलीय.