Shreyas Talpade Heartattack : अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर श्रेयसला त्वरीत अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, श्रेयस तळपदे त्याचा आगामी चित्रपट वेलकम टू द जंगलचे शूटिंग करत होता. मात्र अचानक ही घटना घडली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.