पूर्वी रोजच्या वापरात असणारी तांब्या पितळेची भांडी आता दुर्मिळ झाली आहेत. मात्र, आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या या भांड्यांकडे पुन्हा लोकांचा कल वाढतोय. सोबतच घरात वापरायच्या तांब्या-पितळेच्या विविध वस्तूंनाही मागणी वाढत आहे. यामध्ये पितळेची आरती, समई, मूर्तीं आवर्जून घेतली जाते. आपणालाही या वस्तू खरेदी करायच्या असतील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या वस्तूंचं खास मार्केट असून एकाच ठिकाणी स्वस्तात मस्त वस्तू भेटतात.