एखाद्या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवायची असेल तर सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याची गरज असते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व वाहनांसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत. जर कोणी रस्त्यावरती अनधिकृतपणे वाहन पार्क केली असतील किंवा नो पार्किंगचा बोर्ड असताना देखील पार्क केली असतील तर त्यांना महानगरपालिकेकडून दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी माहिती दिली आहे.