After meeting the Central Commission for Backward Classes, Sambhaji Raje Chhatrapati held a press conference in the capital Delhi and presented his position. He also informed about the discussion held in this meeting. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळाने आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आज भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी राजधानी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसेच या बैठकीत झालेली चर्चेबद्दलही त्यांनी माहिती दिली.