क्रिकेट विश्वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण ज्या मैदानात सचिन लहानाचा मोठा झाला, ज्या मैदानात त्याने अखेरचा सामना खेळला त्या मैदानात आता सचिनचा भव्य पुतळा पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड कपमध्ये २ ऑक्टोबरला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना वानखेडे मैदानात होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला सचिनच्या पुतळ्याचे अनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिनसह मैदानात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवारही होते.