ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाचे आपले असे खास महत्त्व असुन काळानुरूप काही ठराविक काळानंतर हे ग्रह आपली राशीतील स्थान बदलत असतात. ज्योतिष शास्त्रनुसार ग्रहांच्या या भ्रमनाचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत असतो. येत्या 30 ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण समजले जाणारे राहू-केतू दुसऱ्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. या भ्रमानामुळे 5 राशींतील लोकांना त्याचा फार मोठा परिणाम दिसून येणार आहे. 18 महिन्याच्या कालावधीनंतर होणारे राहू-केतूचे भ्रमण अनेक लोकांच्या जीवनात चांगले फळ देऊन जाईल. या राशीं कोणत्या आणि त्याचे काय लाभ होतील या बद्दल नागपुरातील ज्योतिषशास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद डॉ. भूषण यांनी अधिक माहिती दिली आहे.