आयुष्य म्हटलं की चांगले वाईट प्रसंग आलेच आणि याला न घाबरता आपण आपल्या आयुष्याला हसत तोंड द्यायचं असंत असं म्हणतं पुण्यातील सविता कुंभार या गेले 20 वर्ष व्हॅन चालवतायत. पतीच निधन झाल्यानंतर खचून न जाता आपल्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन गाडी चालवण्याचा प्रवास त्यांनी सुरु केला. त्यांच्या याच प्रवासाने त्यांना आज जवळपास 65 पुरस्कार प्राप्त करून दिले आहेत आणि त्यांनी समाजात आदर्श घालून दिला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास कसा आहे पाहूया.